खरं म्हटल्यास ह्या
मानबिंदू ह्या संकल्पनेचा जन्म झाला तोच मुळी
ऑर्कुटवरील 'मानबिंदू'
ह्या कम्युनिटीपासून! विनोदी, वैचारीक, माहितीपूर्ण,
प्रबोधनात्मक असं विविध प्रकारचं लेखन
या कम्युनिटीवर नेहमीच होत असतं.
ह्याखेरीज कविता, गप्पाटप्पा आणि विविध विषयांवरच्या चर्चा
सुद्धा इथे खूप रंगतात. ह्या
कम्युनिटीमधले अनेक सदस्य
सातत्याने विविध विषयांवर अगदी मुद्देसुदपणे आपले विचार
मांडत आले आहेत. आता इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी
आम्हाला फ़क्त ऑर्कुटपर्यंतच मर्यादीत ठेवणं योग्य वाटलं
नाही. म्हणूनच या कम्युनिटी मधल्या निवडक लेखनाला
इंटरनेटवर प्रसिद्धी देणारी वेगळी वेबसाईट बनवायचं आम्ही
ठरवलं आणि त्यातूनच जन्म झाला मानबिंदू.कॉम चा!
बघता बघता गेल्या दीड वर्षात ही
वेबसाईटही खूप लोकप्रिय झाली. आम्ही त्यात नवनवीन सदर सुरू
करून मानबिंदूचं व्यासपीठ अधिकाधिक रुंदावण्याचा प्रयत्न
केला आणि लोकांचाही ह्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला; खूप
कौतूक वाट्याला आलं. आज हे मानबिंदूचं देखणं रूप आम्ही बनवू
शकलो ते ही तुमच्या प्रेमामुळेच. तुमचं हे प्रेम असच मिळत
राहो ही सदीच्छा!
तुम्हालाही वाटत
असेल की तुम्ही ही ह्या मानबिंदूच्या परिवारात सामील व्हावं,
मानबिंदूबद्दल चर्चा करावी किंवा तुमचंही लेखन,
कविता ह्या वेबसाईटवर प्रसिद्ध व्हावं तर आजच
मानबिंदूची ऑर्कुटवरील कम्युनिटी जॉईन करा.
तिथल्याच निवडक विषयांना ह्या सदरात प्रसिद्ध केलं जातं !...
चला तर
पाहूया मानबिंदूच्या ऑर्कुटकट्ट्यावर सध्या काय
चाललय !!