आम्ही शिल्पकार उद्याचे

तंत्रज्ञानाचा वापर करून आजच्या तरुणाईमधील कला लोकांपर्यंत पोहोचवणं हे ह्या सदराचं उद्दीष्ट आहे. गायन, वादन, लेखन, नृत्य, अभिनय, छायाचित्रण, चित्रकला ह्या आणि यांसारख्या अनेकविध क्षेत्रात काम करणा-या प्रतिभावंत व्यक्तिंची ही कला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल! ह्या सदरात आपण भेटणार आहोत.आपल्या काही कलाकारांना/व्यक्तिंना ज्यांनी एखाद्या कलेमध्ये/क्षेत्रामध्ये स्वत:ला झोकून दिलयं !

कला ही लोकाश्रयावर आधारीत आहे असही बरेचदा म्हटलं जातं. म्हणूनच ह्या क्षेत्रात कार्यरत असणा-या अनेक प्रतिभावंत आणि मेहनती कलाकारांचे कार्य लोकांसमोर यावं आणि पर्यायाने त्यांनी घेतलेल्या श्रमांचं आणि त्यांच्या कलेचं चीज व्हावं हा ही ह्या सदरामागील मूळ उद्देश आहे.