'रंगमंच' या शब्दातच बरच काही दडलेलं आहे. आपल्या
जीवनातले अभिनय, संगीत, नृत्य, कविता अशा विविध कलांचे रंग
ज्या मंचावर सादर होतात, तो
'रंगमंच'! पण तरीही
रंगमंच म्हटलं की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं ते नाटक!
मग ते व्यावसायिक
असो, प्रायोगिक
असो किंवा संगीत नाटक.
या प्रत्येक प्रकारच्या नाटकाचा स्वत:चा असा एक वेगळा बाज
आहे,एक वेगळी खासियत आहे आणि म्हणूनच या तीनही प्रकारची
नाटकं पहाणं हा स्वत:मध्ये एक खूप वेगळा अनुभव असतो! अशाच काही
अगदी निवडक नवीन नाटकांची झलक बघणार
आहोत रंगमंच या विभागात! ह्या व्यतिरिक्त रंगमंचावर
सादर होणा-या अनेक संगीत मैफ़िली, एकपात्री कार्यक्रम हे
सुद्धा तुमच्या आवर्जून भेटीस आणण्याचा आमचा
प्रयत्न असेल..
Natak.maanbindu.com - All about Marathi Natak, Maifeeli, Cultural Programs
पुण्यात प्रथमच ए. आर. रेहमानचा
लाईव्ह शो होतोय! या कॉन्सर्ट्च्या निमित्ताने ऑस्कर
जिकंल्यानंतर रेहमान प्रथमच लोकांसमोर येत असून हा
कॉन्सर्ट हा रेहमनाच्या जय हो या वर्ल्ड टूरचा एक भाग आहे.
अधिक माहिती
Natak.maanbindu.com - All about Marathi Natak, Maifeeli, Cultural Programs
स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणाई पर्यंत पोहोचवण्याचा
निखळ आणि प्रामणिक प्रयत्न हे नाटक करतय. ह्या निमित्ताने
सामान्य नरेंद्र पासून ते स्वामी विवेकानंद हा त्यांचा
प्रवास कसा झाला हे ही आपल्याला पहायला मिळेल. सांगायची
विशेष गोष्ट म्हणजे ३६ तासात ११ प्रयोग करण्याचा विक्रमही
या नाटकाने केलाय ! चला जाणून घेऊया,
संन्यस्त
ज्वालामुखी बद्दल..