|
विडंबन |
| |
|
मूळ गीत : गोरी गोरी पान,
फुलासारखी छान......
|
|
गारवा मधल्या एका कवितेच
विडंबन |
|
महाराष्ट्राचे वाल्मिकी व
शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर व येथील मातब्बरांची माफी मागून हा प्रयत्न-
चाल : मूळ गीताप्रमाणेच गावे, आनंद द्विगुणित होतो असा अनुभव आहे.
पार्श्वभूमी :
ताई : दादा! आई सांगत होती की तू म्हणे हुंडा मागायचं म्हणतोस ? खरंय का रे
हे ? आणि देवदयेनं काय कमी आहे रे आपल्याला ?
दादा : काय हरकत आहे ? एवढा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मी, म्हंटलं तर
गुलबकावलीचं फुल. आणि मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा तू गाणं म्हण, गोरी गोरी
पान......
ताई : बरं बाबा, म्हणते ऐक !
गोरी गोरी पान, पैसेवाली छान
दादा मला एक वहिनी आण
वहिनीला आणायाला घेऊ या रे हुंडा
ऑफीसला जायला तुला नवी होंडा
डिग्रीची अपुल्या मनी ठेव जाण
दादा मला एक वहिनी आण
वहिनी अशी आण जशी कुबेराची मुलगी
कायमची राहो तिची पैशाशी सलगी
स्वाभिमान जरी तुझा पडला गहाण
दादा मला एक वहिनी आण
कधीपासून करायचा आहे तुला धंदा
पैसेवाला सासरा रे मग कसला वांधा ?
सासऱ्याच्या बोलण्याला डोलव रे मान
दादा मला एक वहिनी आण
सारं काही कर परी एक रे विनंती
आई-बापाची तरी जाण ठेव अंती
नाही तर बायको तुझी होईल वरताण
दादा मला एक वहिनी आण
सोनंचांदी, पैसाअडका हेच का रे सारं ?
माणसांच्या प्रेमातच सुख आहे खरं !
घेऊ नको मनावर शब्दांचे बाण
दादा मला एक वहिनी आण
गोरी गोरी पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण !
(हुंडाविरोधक) अभिजित पापळक
|
|
मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????
वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.
घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???
मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.
बघ माझी आठवण येते का..????
यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस.
या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर.
या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये.
घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी.... मेल करताना...
बघ माझी आठवण येते का???
|
| |
|
|
|
मूळ गीत- बाई माझी करंगळी
मोडली |
|
मूळ गीत- बाई माझी करंगळी
मोडली |
|
ऐन दुपारी ह्या रॅम्पवरी, गर्मी किती वाढली
बाई माझी चोळी घरंऽगळली
की बाई माझी चोळी घरंऽगळली
अंगातून मी कोट काढताना
अवचित उघडा पडला खजिना
सत्वर सावरुन, ह्या घटनेतुन, किर्ति किती जोडली
बाई माझी चोळी घरंऽगळली
समोर मिडिया उभा आडवा
फ़्लॅशच पाडला (कॅमेरा आणायचे काही कारण होते का?)....
फ़्लॅशच पाडला, एम. एम. एस. धाडला
मीही रडले, 'नाट्य' जरि घडले, फॅशन 'फ़िक्स' जाहली
की बाई माझी चोळी घरंऽगळली
|
|
ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!
वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!
पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!
जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!
--- राखी सावंत
|
| |
|
|
|
हीची चाल तुरूतुरू |
|
मूळ गीत- भातुकलीच्या
खेळामधली |
|
ही चाल धप्प धप्प
होई धरणीचा कंप
काही घरेही ढासळली
कशी केरळच्या वनात
मनातल्या मनात
हत्तीण घाबरली
जिलब्यांची रिचवून रास ना
लाडवांचे घेऊन घास ना
बासुंदी पुरी चाप ना
कितीका वाढे मग माप ना
तू दणदण जाता, भार येइना पेलता, भुई पावलांनी हादरली..
कशी केरळच्या वनात, मनातल्या मनात, हत्तीण घाबरली..
फुकाच पिझ्झा हाणून, उगाच देशील ताणून
उदर भरवून भातानं, गहु तुला लागती पोत्यानं
हा टेप ही पुरेना, वजनकाटा ही हलेना, रणगाड्याचीही मस्ती जिरली..
कशी केरळच्या वनात, मनातल्या मनात, हत्तीण घाबरली..
|
|
डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी
भल्या पहाटे केव्हा त्यांच्या नळास पाणी येते
झोपेतून ते उठण्याआधी पाणी निघून जाते
तळमजल्यावर जाऊन आणतो राजा रोजच पाणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी
तिला विचारी राजा इतुके बिल कसे चुकवावे
का पाण्याने महिनो महिने बिल असे धाडावे
त्या राणीच्या हातात होती यादी केविलवाणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी
त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना
त्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना
रोजरोजची सुरुच आहे त्यांची अशीच कहाणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी
संध्याकाळी कळते त्याला आपुली धडगत नाही
कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही
स्टेशनवरती उडून जाते एक उदास विराणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी
|